महाराष्ट्रात शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. संपूर्ण महाराष्ट्राचं या सोहळ्याकडे लक्ष वेधलं आहे. न्यूज प्लॅनेट या लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रमात मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहुयात काय म्हणाल्या अमृता फडणवीस.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याबाबत अमृता फडणवीस यांना लोकशाही मराठीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनीही महायुतीला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. आपले पती फॅमिली मॅन, समजुतदार, शांत स्वभावाचे आहेत. आपली मुलीग दिवीजावर खूप प्रेम करतात. फॅमिलीला जास्त वेळ देऊ शकत नाहीत. मात्र, आता महाराष्ट्रच त्यांचं घर आहे. महाराष्ट्राला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करतात. त्यातच आम्हाला आनंद आहे. देवेंद्र फडणवीस हे ३-४ तासच झोपतात. लोककल्याणकारी कार्य, राजकारणामध्ये ते कायम व्यस्त असतात.
देवेंद्रजींना डोसा बनवायला आवडतं...
देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीनिवडी काय आहेत. ते कुटुंबासोबत कसा वेळ घालवतात याविषयी विचारलं असता अमृता फडणवीस यांनी एक खास आठवण यावेळी सांगितली. त्या म्हणाल्या, देवेंद्रजी यांना डोसा बनवायला आवडतं. फार आधी काही वर्षांपूर्वी देवेंद्रजी यांनी डोसा बनवून आवडीने कुटुंबाला खाऊ घातला होता. मात्र, सध्या अमृता फडणवीस यांना स्वत: किचनमध्ये जाण्यास वेळ मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्रीपदाची शपथविधी ही जबाबदारीची गोष्ट आहे. महाराष्ट्राला प्रगती पुढच्या टप्प्यांत नेण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्रजी यांची अनेक स्वप्नं आहेत. शेतकरी आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करणे, लाडकी बहिण सारख्या योजना, तरूणांसाठी योजना, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, परदेशी गुंतवणूक अशी अनेक स्वप्नं फडणवीस यांना पूर्ण करायची आहेत. शहरांचं आधुनिकीकरण करताना त्यांची संस्कृती जपायची आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-