Pashchim Maharashtra

आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; दत्तात्रय लोहारांना दिली बोलेरो कार भेट

Published by : Lokshahi News

संजय देसाई, सांगली | अनोखी मिनी जिप्सी बनवून सांगली देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभर चर्चा रंगली होती. या संदर्भातला व्हिडीओ पाहिल्यानंतर महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी बोलेरो (Bolero) देतो असे ट्विट केले होते. आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केली. यामुळे आज लोहार कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हिरो कंपनीच्या Passion या मोटारसायकलीपासून जीप तयार करून आपल्या अनोख्या कौशल्यामुळे देशभर प्रसिध्द झालेले कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावचे दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी बोलेरो गाडी भेट देण्याचे वचन पुर्ण केले.

त्यानिमित्ताने आज सह्याद्री मोटर्स सांगली येथेत्यांना गाडी भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या लोहार कुटूंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या दत्तात्रय लोहार यांचे कौशल्य नक्कीच कौतूकास्पद आहे. यावेळी सोबत सांगली लोकसभा मतदारसंघाचे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा