बिग बॉस

Arya Jadhao Big Boss Marathi 5: बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधवचं अमरावतीत जोरदार स्वागत...

आर्या बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती अमरावती म्हणजेच तिच्या शहरात दाखल झाली आणि यादरम्यान तिचा जंगी स्वागत सोहळा करण्यात आला.

Published by : Team Lokshahi

कलर्स मराठीवरील सर्वात लोकप्रिय असा कार्यक्रम बिग बॉस मराठी ज्याला आजवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपूर्वी खूप काही घडून गेलं. ज्यात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्याची घटना घडली आणि आर्याने केलेल्या त्या कृत्यामुळे तिला बिग बॉसचे घर सोडावे लागले. ज्याचा सर्वात मोठा फटका बिग बॉस मराठी या कार्यक्रमाला बसला. निक्की आणि आर्यामध्ये बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून खटके उडत होते आणि निक्कीचा खेळ तसेच निक्कीची इतर स्पर्धकांसोबतची वागणूक प्रेक्षकांना ही आवडत नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियवरून समोर येत होत. त्यामुळे प्रेक्षकांचा फूल सपोर्ट आर्याला असल्याचं पाहायला मिळत होत. पण नुकत्याच झालेल्या एका प्रकरणावरून आर्याला घरातून एलिमिनेट करण्यात आलं होत.

मात्र आर्याच्या त्या कृत्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आर्याला बिग बॉसच्या घरातून बेदखल केल्यामुळे प्रेक्षकांकडून बिग बॉस मराठी या कार्यक्रमावर आणि रितेश देशमुखवर टीका करण्यात आल्या. तर आता आर्या बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती अमरावती म्हणजेच तिच्या शहरात दाखल झाली आणि यादरम्यान तिचा जंगी स्वागत सोहळा करण्यात आला. मोठ्या संख्येने त्याठिकाणी आर्याचे स्वागत करण्यासाठी अमरावतीकर उपस्थित होते. तर अनेक जणांनी तिच्यासोबत बोलण्याचा आणि बिग बॉसच्या घरातील घडामोडींवर संवाद साधण्याचा प्रयत्न देखील केला. अमरावतीत दाखल होत असताना ती काळ्या लक्झरी कारमध्ये दिसली आणि तिथे जमलेल्या लोकांसाठी तिने स्वतःचा एक रॅप सुद्धा गावून दाखवला. आर्या अमरावतीत दाखल झाल्यानंतर निक्कीच्या कानाखाली मारल्याबद्दल अमरावती तसेच इतर तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले.

अमरावतीकरांना भेटल्यानंतर आर्या म्हणाली, मला खूप छान वाटत आहे अमरावती माझी जागा आहे. अमरावतीचे लोक माझे लोक आहेत आणि मला माहित नव्हतं मी इथे आल्यानंतर हे सगळ होणार आहे एवढ्या मोठ्या जल्लोषात माझं स्वागत केलं जाईल. पण तुम्ही ज्याप्रकारे मला प्रेम दिलं आणि देत आहेत. त्याने माझं मन भरून आलं आहे. धन्यवाद सगळ्यांना आणि धन्यावाद अमकावतीकरांना. असं म्हणतं आर्याने अमरावतीकरांचे आणि तिच्या चाहत्यांचे आभार मानले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा