पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार 
India

Election Result 2022 LIVE : ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

Published by : Shweta Chavan-Zagade

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (assembly election result 2022) आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे.  मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.

बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे काँग्रेसने गेल्या वेळी झालेला गलथानपणा टाळण्याची दक्षता घेतली आहे. २०१७ मध्ये गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा असतानाही तिथे भाजप सरकार बनवण्यात यशस्वी झाला होता. मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेत काँग्रेसवर मात केली होती. या वेळी गोव्यातील सर्व उमेदवारांना काँग्रेसने हॉटेलमध्ये एकत्र केले असून निकालानंतर होणारा संभाव्य घोडेबाजार टाळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.

गोव्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांवर नजर ठेवणे, तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व अन्य पक्षांशी सरकार बनवण्यासाठी चर्चा करणे या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निवडणूक प्रभारी पी. चिदम्बरम आणि कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आल्या आहेत. महासचिव मुकुल वासनिक, छत्तीसगढचे नेते टी. एस. सिंह देव आणि व्हिन्सेंट पाला यांना मणिपूरला पाठवण्यात आले आहे.

भाजपनेही विजयाची शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी सुरू केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भाजपने ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची सोपवली असून तेही गोव्यात दाखल होत आहेत. उत्तराखंडमध्येही भाजपचे सरकार असून सत्ता टिकवण्यासाठी भाजपने कैलास विजयवर्गीय यांना देहरादूनला पाठवले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक