Vidharbha

ऑडिओ क्लिप व्हायरल; राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पोलिस अधिकाऱ्याला झापलं

Published by : Lokshahi News

सूरज दाहाट, अमरावती | शेतकरी, सर्वसामान्यांसाठी आक्रमक होणारे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) कायमच आक्रमक असतात. अशाच आक्रमक पावित्र्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमधअये बच्चू कडू यांनी पोलिस अधिकाऱ्याला दमदाटी केली आहे. एका शेतकऱ्यांच्या (Farmer) तक्रारीची दखल पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याचं कळताच कडू यांनी थेट त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्याला चांगलंच झापलं. या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून भाजपकडून बच्चू कडू Bachchu Kadu यांच्यावर टीका होत आहे.

ऑडिओ क्लिप ही वाशीम जिल्ह्यातील जऊळका येथील आहे,येथील ठाणेदार मोरे यांना कायदा समजवताना राज्यमंत्री बच्चु कडू Bachchu Kadu यांनी धारेवर धरलं होत तर वर्ष भरापूर्वीची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती आहे,मात्र ठाकरे सरकार मधील मंत्री अस बोलत असतील तर काय म्हणावं हा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग शेत शिवारातील आंधळे नामक युवक शेतकऱ्यांची शेती एपको कंपनीने परवानगी न घेता शेती खोदली याबाबत एका शेतकऱ्याची बाजू मांडताना बच्चू कडू Bachchu Kadu यांचा ठाणेदाराशी फोनवर बोलतांना तोल घसरला, तुमच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करत नाही असा संतप्त सवाल बच्चू कडू Bachchu Kadu यांनी यात संभाषणात विचारला आहे,साधी एनसी दाखल करत नाही चौकशी करत नाही.हे बरोबर नाही.मी दोन दिवस वाट पाहतो कारण एपको कंपनी मोठी असल्यामुळे आणि सांगेन खुद गुन्हा केल्यानंतर सुद्धा ठाणेदार यांनी गुन्हा का दाखल केला नाही याची चौकशी लावावी व या ठाणेदारावर कारवाई करावी असे पत्र मी दोन दिवसांन देतो असं बच्चू कडू Bachchu Kadu म्हणाले.

सातबारा आंधळेच्या नावने आहे.त्या कंपनीने खोदल त्याचा रिपोर्ट दिलेलं आहे.ह्या केसमध्ये माझासारखा xxxx जाल कायद्याच नॉलेज नाही असा मंत्री तुम्हाला सांगतोय की तुम्ही शेतामध्ये जायला पाहिजे पंचनामा करायला पाहिजे शेत खोदल आहे का नाही आहे….खोदल आहे तर रिपोर्ट दिला आहे. गुन्हा दाखल करायला पाहिजे, तुम्ही बरोबर कंपनीच्या बाजून एमएस आरडीसीचा रिपोर्ट घेतो अस करतो तस करतो त्याच काय संबंध आहे.

मी उद्या तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन जेसीबी लावून खोदतो तुम्ही कोणाचा रिपोर्ट घ्याल हे सांगा…तो ठेकेदार एम,एसआरडीसीचा असूदे कातो ….. जाऊदे सगळं तुम्ही माझ्यासारख्याला घुमून राहले करूका तक्रार तुमची तुम्ही सांगा दिलेल्या रिपोर्टवर काय कारवाई केली हे महत्त्वाचे मी तुमची दोन दिवस वाट पाहतो जर तुम्ही दोन दिवसांत कारवाई नाही केली तर मी त्या शेतकऱ्यांला उपोषणाला बसवतो आणि अंगावर रॉकेल घ्यायला सांगतो आणि तुमची शेकून टाकतो…असा दम राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जऊळका पोलीस स्टेशनच्या ठाणेदार मोरे यांना दिला.. तर यात बच्चू कडू यांनी ठाणेदाराला शिवीगाळही केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली