Bala Nandgaonkar Lost Shivdi 
Candidates Profile

Bala Nandgaonkar: शिवडीतून बाळा नांदगावकर यांचा पराभव, अजय चौधरी विजयी

शिवडीतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उभे असलेले उमेदवार अजय चौधरी विजयी झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

शिवडीतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उभे असलेले उमेदवार अजय चौधरी विजयी झाले आहेत. अजय चौधरी यांना 71888 मतं मिळाली आहेत. तर बाळा नांदगावकर यांना 63846 मते मिळाली आहेत. १९ पैकी १८ व्या फेरीतील ही आकडेवारी आहे. बाळा नांदगावकर यांचा साधारण ८ हजार मतांना पराभव झाला आहे.

मुंबईमधील हायव्हॉल्टाज लढतीपैकी एक शिवडी मतदारसंघातील लढत होय. शिवडीत मतदारसंघातून 2009 साली मनसेकडून बाळा नांदगावकर निवडून आले होते. त्यांनंतर 2014 आणि 2019 साली शिवसेनेकडून अजय चौधरी विजयी झाले. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विद्यमान आमदार असलेले अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांना अजय चौधरी यांचं आव्हान होतं. मात्र, नांदगावकरांचा पराभव झाला आहे.

बाळा नांदगावकर यांना मनसेकडून उमेदवारी:

बाळा नांदगावकर हे महाराष्ट्रातील राजकारणी असून त्यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती.

बाळा नांदगावकर यांची राजकीय कारकीर्द:

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?