Business

Bank Holidays| ऑगस्टमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, लवकर करून घ्या तुमची काम

Published by : Lokshahi News

ऑगस्टमध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये बँका एकूण 15 दिवस (RBI Bank Holidays List) बंद राहतील. दर रविवारी आणि महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय प्रत्येक राज्यात वेगवेगळे सण, जत्रा किंवा कोणत्याही विशेष कार्यक्रमामुळे त्या राज्यातील बँकांमध्ये सुट्टी असते. अशा परिस्थितीत ऑगस्टमध्ये बँका केव्हा बंद होतील हे जाणून घ्या.

ऑगस्ट 2021 मध्ये 'या' दिवशी बँका राहणार बंद
1 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने बँका बंद राहतील.
8 ऑगस्ट 2021: हा दिवस देखील रविवार आहे, म्हणून बँकेत सुट्टी असेल.
13 ऑगस्ट 2021: Patriots Day मुळे इम्फाल झोनमध्ये बँका बंद राहतील.
14 ऑगस्ट 2021: दुसर्‍या शनिवारी बँका बंद राहतील.
15 ऑगस्ट 2021: रविवार आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बंद होतील.
16 ऑगस्ट 2021: पारशी नववर्षामुळे या दिवशी महाराष्ट्राच्या बेलापूर, मुंबई आणि नागपूर विभागांत बँका बंद राहतील.
19 ऑगस्ट 2021: मोहरममुळे आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर या भागांत बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट 2021: मोहरम आणि पहिल्या ओणममुळे बंगळुरू, चेन्नई, कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल.
21 ऑगस्ट 2021: थिरुवोणममुळे कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल.
22 ऑगस्ट 2021: रक्षाबंधन आणि रविवारी या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
23 ऑगस्ट 2021: श्रीनारायण गुरू जयंतीमुळे कोची आणि केरळ झोनमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.
28 ऑगस्ट 2021: चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
29 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने बँका बंद राहतील.
30 ऑगस्ट 2021: जन्माष्टमीमुळे बँका या दिवशी बँका बंद राहतील.
31 ऑगस्ट 2021: श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू