India

Basavaraj Bommai : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई; धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

Published by : Lokshahi News

नंदकिशोर गावडे । कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाची माळ बसवराज बोम्मई यांच्या गळ्यात पडली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली आहे. येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची मुख्यमंत्रिपदी बसवराज बोम्मई यांची वर्णी लागली आहे.

कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाने नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज संध्याकाळी बेंगळुरू येथे भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. भाजपच्या पक्षश्रेष्ठीनी नवी दिल्लीतील वरिष्ठ नेते पाठविले असून ते या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याप्रमाणेच नवीन मुख्यमंत्रीदेखील राजकीयदृष्ट्या प्रभावी लिंगायत समुदायाचे आहेत.

दरम्यान येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. "कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे" अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोण आहेत ?

बसवराज बोम्मई हे सदारा लिंगायत समुदायाचे आहेत. ते बी एस येडियुरप्पा यांचे निकटचे विश्वासू आहेत. त्यांचे वडील एसआर बोम्मई यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.

२००८ मध्ये बसवराज बोम्मई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ते पक्षात कार्यरत आहेत. ते व्यवसायाने अभियंता असून टाटा समूहापासून करिअरची सुरूवात केली. ते दोनवेळाचे एमएलसी आणि तीनवेळा हावेरी जिल्ह्यातील शिगावचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सायंकाळी झालेल्या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पाठविलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, जी किशन रेड्डी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण सिंग आणि नलिन कटील यांनी बंगळुरुमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी बंद दरवाजा बैठक घेतली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू