Vidhansabha Election

Beed Vidhan Sabha Election Result 2024; कोणत्या मतदार संघात कोणाची प्रतिष्ठा?

बीड विधानसभा निवडणूक 2024: क्षीरसागर, मुंडे आणि पवार कुटुंबातील प्रतिष्ठेची लढत. कोणता उमेदवार विजयी ठरणार? जाणून घ्या!

Published by : shweta walge

बीड मतदार संघात क्षीरसागर कुटुंबाची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या मतदारसंघात क्षीरसागर चुलत भावांविरोधात राजकीय लढत झाली. त्याबरोबरच तीन उमेदवार मराठा समाजाचे होते त्यामुळे मराठा फॅक्टर देखील किती चालतो याकडे लक्ष असणार आहे.

परळी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष निर्माण झाला होता. परळी मतदार संघात मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे या दोघा बहिण भावाची प्रतिष्ठापनाला लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

गेवराई मतदार संघात पंडित पवार कुटुंबाची प्रतिष्ठापनाला लागली आहे. या मतदारसंघात विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित या चुलते पुतण्यात लढत झाली. तर दुसरीकडे विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजपात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा संघर्ष निर्माण झाला होता.

माजलगाव मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष झाला. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके तर शरद पवार गटाकडून मोहन जगताप यांच्यात लढत झाली. तर अपक्ष उमेदवारांनी देखील या दोघांना कडवे आवाहन दिले आहे.

केज मतदार संघात खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला आहे. भाजपाकडून नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांच्यात राजकीय लढत झाली. स्वतः बजरंग सोनवणे या ठिकाणी लक्ष ठेवून होते. कारण की त्यांच्याच मतदारसंघात त्यांना प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन असणार आहे.

आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत झाली असून भाजपाकडून सुरेश धस राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे यांनी निवडणूक लढवली. तर शरद पवार गटाकडून मेहबूब शेख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे या मतदारसंघात या चार पैकी कोणता उमेदवार निवडून येतो? याकडे लक्ष असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा