India

Punjab Election : भगवंत मान ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!

Published by : Lokshahi News

पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमख राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात असून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारदेखील जाहीर केला जात आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून भगवंत मान हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. अरविंद केजरीवाल हे आज भगवंत मान यांच्या नावाची घोषणादेखील करण्याची शक्यता आहे.

नागरिकांकडून आलेल्या फोन कॉल्स व मेसेजमध्ये भगवंत मान यांचेच नाव आघाडीवर दिसून आले आहे. पंजाबच्या राजकारणात येण्याअगोदर भगवंत मान यांनी आपलं संपूर्ण कुटुंब सोडलं आहे. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे आणि आता त्यांच्या मुलांशीदेखील त्यांचा फारसा संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे.

भगवंत मान यांना २०१७ मध्ये पक्षाचे पंजाब प्रमुख बनवण्यात आले होते. ते पक्षाचे संसदेत निवडून आलेले एकमेव खासदार आहेत आणि पक्षाचे सभागृहात नेतृत्व करतात. संगरूरमधून त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. कॉमेडी विश्वात खूप नाव कमावल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य