India

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला १८ वर्षाखालील मुलांवर चाचणीस परवानगी

Published by : Lokshahi News

देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलास असून, या लाटेत सर्वाधिक संक्रमण हे लहान मुलांना होणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेविरोधातील तयारी म्हणून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची शिफारस तज्ञ समितीने केली होती. दरम्यान ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने कोव्हॅक्सिनच्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणीस मान्यता दिली. भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार आहे.

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची 'मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार असून केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली होती.

भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. सविस्तर चर्चेनंतर समितीने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर समिती तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची शिफारस करणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर