Candidates Profile

Bharat Gogawale win Mahad Assembly Election Result 2024: महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी!

महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर नेते भरत गोगावले विजयी झाले. भरतशेठ गोगावले सध्या महाड मतदार संघाचे सद्य आमदार आहेत आणि पुन्हा एकदा आमदारपदाची शपथ घेण्यास ते सज्ज झाले आहेत.

Published by : shweta walge

महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर नेते भरत गोगावले विजयी झाले. भरतशेठ गोगावले सध्या महाड मतदार संघाचे सद्य आमदार आहेत आणि पुन्हा एकदा आमदारपदाची शपथ घेण्यास ते सज्ज झाले आहेत. गोगावले यांना १ लाख १७ हजार ४४२ मते मिळाली. तर उद्धव ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांना ९१ हजार २३२ मते मिळाली. त्यांचा २६ हजार २१० मतांनी पराभव झाला.

गेल्या पाच वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मतदार देखील होते. पण आता निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर महाड मध्ये भरत गोगवलेंचाच करिष्मा चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

भरत गोगावले यांचं या मतदारसंघात वर्चस्व आहे. 2019 मध्ये भरत यांचा 94,408 मतांनी विजय झाला होता. काँग्रेसच्या माणिक जगताप यांना त्यांनी पराभूत केलं होतं. तर 2009 आणि 2014 मध्येही भरतशेठ हेच या मतदारसंघाचे आमदार होते. पण पक्षफुटीनंतर मतदारांची निष्ठा भरतशेठ यांच्याशी जोडलेली राहणार कि मतदारांची नाराजी निकालात दिसून याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य