बिग बॉस

Big Boss Marathi 5: बिग बॉसच्या लगोरीत अंकिता आणि वर्षाताईंमध्ये धरपकड...

बिग बॉसच्या घरात एक गेम पार पडणार आहे ज्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये अंकिता V/S वर्षा उसगांवकर असा सामना पाहायला मिळणार आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉसचा ग्रँड फिनाले आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बिग बॉस मराठीच्या इतिहासात असं पहिल्यांदा असं झालं असेल ज्यात 100 दिवसांचा बिग बॉस आता 100 दिवसांचा बिग बॉस आता 70 दिवसांमध्ये पार पडणार आहे. हा निर्णय बिग बॉस मराठी पर्व 5 मध्ये खुद्द बिग बॉसने सर्व सदस्यांसमोर सांगितला आहे. अनेक प्रेक्षक बिग बॉसच्या या निर्णयाला सहमत नसल्याचं पाहायला मिळत आहे तर बिग बॉसच्या या निर्णयाने अनेक कलाकार तसेच आधीच्या काही पर्वातील बिग बॉसचे जुने सदस्य यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यावेळेस बिग बॉसने हा निर्णय घरातील सदस्यांना सांगितला त्यावेळेस घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकीत झालेले पाहायला मिळाले. तर आता 100 दिवसांचा बिग बॉसचा खेळ हा 70 दिवसांचा होणार आहे. तर येत्या 14 दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार असून 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

तर अशातच बिग बॉसच्या घरात एक गेम पार पडणार आहे ज्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे. त्यात बिग बॉसची लगोरी असा गेम खेळण्यात येणार असून या खेळात देखील दोन जण असा खेळ खेळला जाणार आहे. या प्रोमोमध्ये अंकिता V/S वर्षा उसगांवकर असा सामना पाहायला मिळणार आहे ज्यात वर्षा उसगांवकर या अंकिताला लगोरी लावण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे अंकिता तिच्याकडून अतुट प्रयत्न करत वर्षा ताईंना लांब करत आहे. तसेच त्या दोघींमध्ये ही खेचाखेची आणि धरपकड पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे निक्की वर्षा उसगांवकर यांच्या बाजूने ओरडताना दिसत आहे. मात्र हा खेळ आता कसा रंगणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा