बिग बॉस

Big Boss Marathi 5: आता राडा होणार! राखी की निक्की कोण पडणार कोणावर भारी...

प्रेक्षकांच्या मागणीला मान ठेवून बिग बॉसने एक ट्विस्ट निर्माण केला आहे. राखी सावंतची एन्ट्री बिग बॉस मराठी 5 च्या घरात व्हावी आणि प्रक्षकांच्या याच मागणीला पुर्ण करण्यासाठी बिग बॉसने अगदी शेवटच्या टप्प्यात राखी सावंतला बिग बॉसच्या घरात बोलवलं आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉसचा क्रेज संपूर्ण जगभरात पाहायला मिळतो. हिंदी बिग बॉस असो किंवा मराठी बिग बॉस पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी सज्ज असतात. टीव्हीवर पाहिला जाणारा बिग बॉस आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. तर मराठी बिग बॉस सिजन 5 चा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. कदाचित हे सगळ आत असलेल्या सदस्यांमुळे देखील असू शकतं. बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सिजनमध्ये बिग बॉस सिजन 5 चा टीआरपी आणि चाहतावर्ग हा खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या दिवसांपासूनच बिग बॉस मराठी 5 ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. अनेक राडे आणि भांडण यादरम्यान पाहायला मिळाले बिग बॉसचे काही निर्णय प्रेक्षकांना इतके पटले की टीआरपीच्या शर्यतीत झपाट्याने बिग बॉसने वाढ केली. तर काही वेळा बिग बॉसचे असे काही निर्णय होते ज्यावरून प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली गेली तसेच वाद देखील निर्माण झाले.

प्रेक्षकांच्या मागणीला मान ठेवून बिग बॉसने एक ट्विस्ट निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांकडून अशी मागणी केली जात होती की राखी सावंतची एन्ट्री बिग बॉस मराठी 5 च्या घरात व्हावी आणि प्रक्षकांच्या याच मागणीला पुर्ण करण्यासाठी बिग बॉसने अगदी शेवटच्या टप्प्यात राखी सावंतला बिग बॉसच्या घरात बोलवलं आहे. राखी सावंतची एन्ट्री होताना पाहून घरातील सगळे सदस्य खूश होताना दिसले मात्र घरातील एक सदस्य जो राखी सावंतच्या येण्याने नाराज होताना दिसला आणि तो सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. निक्की आणि राखीची ओळख ही हिंदी बिग बॉस 14 पासून आहे. त्यावेळेस देखील निक्की आणि राखीमध्ये खटके उडताना दिसले. तसेच यावेळेस देखील घरात येताच राखीने निक्कीवर आपला पहिला निशाणा साधला. यादरम्यान निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्यासारख दिसून आला.

तसेच राखी नंतर अभिजित बिचुकले देखील घरात एन्ट्री करताना दिसून आले आहेत. त्यांनी त्यांच्या अंदाजाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तर घरात येताच त्यांनी अंकिताला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. अभिजित बिचुकले घरात येताच ते अंकिताला म्हणाले, तु सुरजच्या चेहऱ्याला लाल रंग लावलास तेव्हाच समजलं बहिण असं कधीच करत नाही स्वार्थीपणा दाखवला तुम्ही तुमचा. असं म्हणत बिचुकलेंनी अंकिताची बोलती बंद केली. मात्र आता एकाच वेळेस राखी सावंत, अभिजित बिचुकले आणि अनिल थत्वे यांनी पदार्पण केलेलं आहे. तर यांच्या येण्याने घरात आधीपासून असलेल्या सदस्यांच काय होईल तसेच राखी की निक्की कोण कोणावर भारी पडणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली