worli matdarsangh 
Mumbai

वरळीत संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, मिलिंद देवरा यांच्यात लढत

वरळीत मनसे नेते मनसे नेते संदीप देशपांडे वि. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांच्यात लढत.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचे नाव : संदीप देशपांडे

मतदारसंघ : वरळी

पक्षाचे नाव - मनसे

समोर कोणाचं आव्हान - आदित्य ठाकरे, मिलिंद देवरा

संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. 1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले.

सध्या संदीप देशपांडे वरळी मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढवत आहेत.

राजकीय कारकीर्द:

  • संदीप देशपांडे 2012 मध्ये मनसेच्या तिकिटावर जी वॉर्ड (दादर) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आणि ते बीएमसीमध्ये मनसेचे नेते आहेत.

  • संदीप देशपांडे यांनी 2016 मध्ये आरटीआयद्वारे कचरा ट्रक कंत्राटदारांनी बीएमसीचा 900 कोटी रुपयांचा घोटाळा उघड केला.

  • बीएमसी नगरसेवक असताना त्यांनी रस्ते, खड्डे, बेस्टचा संप अशा विविध समस्या मांडल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी