बिग बॉस

Bigg Boss Marathi 5: आधी दिवस आता वेळ, बिग बॉसच्या अंतिम टप्प्यात करण्यात येणार वेळेत बदल?

आता बिग बॉसच्या बाबतीत आणखी एक बातमी समोर येत आहे. ज्याप्रमाणे बिग बॉसचे दिवस कमी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता बिग बॉसच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉसचा फॅनबेस आता संपुर्ण राज्य भरातच नाही तर संपूर्ण जग भरात पाहायला मिळत आहे. बिग बॉस आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर अंतिम टप्प्यात असताना बिग बॉस मराठी 5 मध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ज्यात एक एक करून घरातील असे काही सदस्य बाहेर गेले ज्यांच्या जाण्याने बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग कमी झाला. यानंतर बिग बॉसच्या घरात एक ट्विस्ट आला तो म्हणजे असा की 100 दिवसांचा बिग बॉस आता 70 दिवसांचा झाला आहे. येत्या काही दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार असून 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

या निर्णयाने प्रक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती तसेच आत असलेले सदस्य देखील आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बिग बॉसच्या घरात घरातील प्रत्येक सदस्याच्या कुटुंब सदस्याला बोलवण्यात आलं होत. ज्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य भावूक झाला होता आणि आता बिग बॉसच्या घरात आधी होऊन गेले स्पर्धक म्हणजेच राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. आल्या आल्या राखी सावंतने निक्कीला धाऱ्यावर धरल्याच पाहायला मिळालं तर अभिजित बिचुकले यांनी अंकिताला जाब विचारला.

आता बिग बॉसच्या बाबतीत आणखी एक बातमी समोर येत आहे. ज्याप्रमाणे बिग बॉसचे दिवस कमी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता बिग बॉसच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे. 9 ला पाहता येणारा बिग बॉस मराठी 5 आता 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे. 3 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर एक नवी मालिका येत आहे "आई तुळजाभवानी" या मालिकेमुळे बिग बॉस मराठीच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. मात्र आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे कोण होणार बिग बॉस मराठी 5चा विजेता आणि त्या आधी कोणकोणते नवीन ट्विस्ट आणखी पाहायला मिळणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा