बिग बॉस

Bigg Boss Marathi 5: आधी अपमान करणं मग माफी मागणं, जान्हवीचं नक्की सुरु काय? नेटकरींचा उडाला संताप म्हणाले...

जान्हवीने 'सत्याचा पंचनामा' या टास्कदरम्यान पॅडी कांबळे यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल अपमानास्पद बोलताना दिसली. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडदरम्यान जान्हवीने पॅडी यांची माफी मागितल्याच पाहायला मिळालं.

Published by : Team Lokshahi

कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी. कलर्स मराठी या वाहिनीवरील टीआरपीच्या शर्यतीत मोठा पल्ला गाढणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा जोर वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. बिग बॉस मराठीमध्ये सध्या ग्रुप ए आणि ग्रुप बी या दोन ग्रुपमध्ये फार संघर्ष पाहायला मिळत आहे. या मालिकेत जान्हवी कोणासोबत ही बोलताना कसलचं भान ठेवत नाही असं तिच्या वागण्यातून दिसून येत आहे. नुकतचं जान्हवीने 'सत्याचा पंचनामा' या टास्कदरम्यान पॅडी कांबळे यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल अपमानास्पद बोलताना दिसली आणि त्यामुळे नेटकरी फारचं संतप्त झालेले पाहायला मिळाले. जान्हवीच्या या वर्तनामुळे जान्हवी मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसली, मात्र आता तिला पश्चाताप झाल्याचं तिनी प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडदरम्यान जान्हवीने पॅडी यांची माफी मागितल्याच पाहायला मिळालं.

जान्हवी माफी मागत म्हणाली, मी काल जे काही वागले त्याच्यासाठी खरंच सॉरी. यावर पॅडी तिची समजूत काढत म्हणाले, मला वाटलं होत हे कधी तरी तुला बोलावस वाटेल माझ्याशी, जे काही झालं ते माझ्या समोर तर नाही झालं मला कळलं थोटसं ओझरता आवाज आला. तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली होती, तुला खूप मोठी अभिनेत्री बनव हे ऐकल्या बरोबर जान्हवीला तिचे अश्रू अनावर झाले आणि ती ढसाढसा रडायला लागली तिला शांत करत पॅडी म्हणाले, तु ऐक आधी रडू नकोस पुढे ते म्हणाले तुला एवढा स्टॅण्ड घेता यायला हवा की, या माणसासोबत मी काम करणार नाही हा माणुस जर प्रोजेक्टमध्ये असेल, तर मी काम करणार नाही. कारण मी एक काम करू शकतो, कोण-कोण आहेत जान्हवी किल्लेकर आहे? बॉस मी काम नाही करणार असं मी ठरवलं होत. यावर पुन्हा ते म्हणाले, मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे तर तू नको रडू यावर ती पुन्हा रडत रडत माफी मागायला लागली आणि म्हणाली मला सुचत नाही मी रागाच्या भरात काय बोलते. यावर पॅडी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाले, हाच गेम आहे एक जो स्तर असतो तो निश्चित पाळूया. एकमेकांचा आदर ठेवून भांडूया असं म्हणत पॅडी जान्हवीची समजूत काढणाता पाहायला मिळाले.

मात्र यावर संतप्त नेटकरी आपला संताप व्यक्त करत म्हणाले, रितेश सरांचा भाऊंचा धक्का आला की ह्यांना माफी आठवते, खरं तर ते जान्हवीचं रडणं अरबाज ने कॅप्टन पद न दिलेल्याचं होतं, मग ते माफीवर गेलं एवढंच असे मत नोंदवले. तर काहींनी म्हटलं, फेक आहे सगळं असुरक्षित असल्याचे तिला वाटत आहे. निक्की कॅप्टन झाली म्हणून तिने हे नाटक केले आहे. तसेच काही जण म्हणाले, बिग बॉसनेच हिला माफी मागायला सांगितले आहे. हिला कालच पश्चाताप झाला असता मग आर्या तिला बोलत होती तू चुकीचं बोली तर आर्याला माज दाखवत होती आणि आज अचानक असं नाटक आहेत सगळी फालतु आहे ही सुधारणार नाही. असं म्हणत संतप्त नेटकरींनी आपला संताप व्यक्त केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा