बिग बॉस

Bigg Boss Marathi 5: जान्हवीला दादागिरी करणं पडलं भारी! रितेश देशमुख दाखवणार बाहेरचा रस्ता

जान्हवीचा उरमटपणावर भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख तिच्यावर फारचं चिडलेला रितेश देशमुख जान्हवीला म्हणाला,

Published by : Team Lokshahi

बिग बॉस घरात सध्या जान्हवीचा उरमटपणा पाहायला मिळत आहे. तिला मागच्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुखने चांगलेच धारेवर धरलं होत. त्यादरम्यान सगळ्यांना वाटलं होत तिच्यामध्ये सुधारणा झाली असावी पण तसं काही न होता तिने नुकत्याच झालेल्या एका टास्टमध्ये पॅडीच्या करिअरची खिल्ली उडवली आणि त्याच्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होत. त्यादरम्यान नेटकरी आणि इतर मराठी कलाकार तिच्यावर संताप व्यक्त करताना दिसले होते. त्यामुळे तिने नंतर पॅडीची माफी देखील मागितली होती. आता झालेल्या भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख तिच्यावर फारचं चिडलेला पाहायला मिळाला.

रितेश देशमुख जान्हवीला म्हणाला, जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात सर्वात वाईट स्पर्धक आहात. तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना मी सगळ्यांना बाहेर काढेन तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळ इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढणार असं म्हणतं रितेश देशमुखने बिग बॉसच्या घराचा मुख्य दरवाजा उघडायला सांगितले. याव्यतिरिक्त रितेश देशमुख म्हणाला, तुम्ही पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते, लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणतं रितेश देशमुखने जान्हवीच्या उरमट वागण्यावर आळा घालण्यासाठी तिला धाक दिला.

मात्र यावर प्रेक्षकवर्ग आणि चाहतावर्ग यांच्या मनात प्रश्नाचे जाळे निर्माण झाल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळालं. यामध्ये प्रेक्षक कमेंट करत म्हणाले आहेत, पूर्ण एपिसोड बघितल्याशिवाय आम्ही विश्वास ठेवणार नाही. सीनियर ऍक्टर चा अपमान महाराष्ट्र सहन करू शकत नाही कृपया करून तिला बिग बॉस च्या घराबाहेर काढावे. असं म्हणतं चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा