बिग बॉस

Bigg Boss Marathi 5: नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये 'या' चार सदस्यांची नावं, पण एका ट्विस्टने वेधले लक्ष!

बिग बॉस च्या घरात पाचव्या आठवड्यात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे आणि नुकताच या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क देखील पार पडला आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉस च्या घरात पाचव्या आठवड्यात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे आणि नुकताच या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क देखील पार पडला आहे. मानकाप्याची एन्ट्रीमुळे बिग बॉसने घरातील सदस्यांना आदेश दिला की, इथून पुढे आठवडाभर सर्वांना नेमून करून दिलेल्या जोडीदाराबरोबर राहावं लागेल आणि त्यादरम्यान घरातील सदस्यांच्या एकूण ६ जोड्या करण्यात आल्या. त्यामुळे या आठवड्यात जोड्यांनुसार सर्व सदस्यांना नॉमिनेट करावं लागलं.

यावेळेस नॉमिनेट झालेल्यांमध्ये वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत तसेच निक्की तांबोळी या सदस्यांची नाव समोर आलेली आहेत. मात्र या चार सदस्यांपैकी आता कोण एक सदस्य बाहेर पडणार या कडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. हे चार ही सदस्य चर्चेत असताना दिसतात. यावेळेस बहुतांश सदस्यांनी निक्कीला नॉमिनेट केलं त्यामुळे त्याचा धक्का अभिजीतला देखील बसल्याचं पाहायला मिळाला. मात्र यासगळ्यात एक ट्विस्ट समोर आला आहे.

नॉमिनेट सदस्यांची नावं समोर आल्यावर वोटिंग लाइन सुरु केली जाते. जेणे करून प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सदस्याला वोट करून बिग बॉसच्या घरात टिकवून शेवटपर्यंत टिकवून ठेवता येईल. मात्र यावेळेस वोटिंग लाइन अद्याप चालू केलेली नाही ज्यामुळे या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर जाणार नसल्याचे अंदाज लावले जात आहेत. वीकेंडला रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर कोणता आश्चर्याचा फटका देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड

Disha Salian Death Case : घातपात की मृत्यू? दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट