India

जनरल बिपिन रावत यांचं निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

Published by : Lokshahi News

तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत यांचं आज दुर्दैवी निधन झालं. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरावरून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूर भागामध्ये जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये खुद्द जनरल बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सुरक्षा दलातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. या अपघातामध्ये वायुसेनेचे एक अधिकारी बचावले असून ते गंभीर जखमी आहेत. वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

"जनरल बिपिन रावत हे एक अतुलनीय सैनिक होते. एक सच्चा देशभक्त. देशाचं लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धोरणात्मक बाबींवर त्यांची मतं आणि दृष्टीकोन फार महत्त्वाचे असायचे. त्यांच्या निधनामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. ओम शांती", असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत बिपिन रावत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?