India

Bipin Rawat helicopter Crash LIVE Update : सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

Published by : Lokshahi News

भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमध्ये अपघात झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. या अपघातात मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. तर सीडीएस रावत गंभीर जखमी आहेत. यासंदर्भात अधिकृत माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात संसदेत देणार आहे. त्यानंतर ते घटनास्थळी रवाना होण्याची शक्यता आहे.

LIVE Update

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक
  • लष्करी हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू
  • राजभवन दरबार हॉलच्या उद्घाटनचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संध्याकाळी ४ वाजता राज भवन मुंबई येथील नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हॉल चे उदघाटन करण्यात येणार होते. या कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद , महाराष्ट्राचे राज्यपाल, भगत सिंह कोश्यारी त्याच बरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,तसेच मुंबईचा महापौर किशोरी पेंडेकर हे सर्व उपस्थित राहणार होते.
  • घटनास्थळावर तामिळनाडूचे वनमंत्री पोहोचले. 8 जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती
  • संरक्षण मंंत्री राजनाथ सिंह बिपिन रावत यांच्या निवासस्थानी
  • हवाईदल प्रमुख व्ही.आर.चौधरी घटनास्थळी कुन्नूरला रवाना
  • लिकॉप्टर अपघातात 11 जणांचा मृत्यू, तिघ अत्यवस्थ; सीडीएस रावत गंभीर जखमी
  • तामिळनाडू मुख्यमंत्री एम के स्टॅलिन पाच वाजता दुर्घटनास्थळी जाणार
  • तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. तर सीडीएस रावत गंभीर जखमी आहेत. यासंदर्भात अधिकृत माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात संसदेत देणार आहे. त्यानंतर ते घटनास्थळी रवाना होण्याची शक्यता आहे.
  • आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह हाती, पीटीआयचं ट्विट
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावली तातडीची बैठक
  • पंतप्रधान मोदी यांना राजनाथ सिंह यांनी फोन करून माहिती दिली

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात