India

बीरभूम हत्याकांड: राष्ट्रीय मानवाधिकार हक्क आयोग करणात तपास

Published by : Team Lokshahi

पश्चिम बंगालमधील (West Bengal) बीरभूम (Birbhum) हत्याकांडाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (human rights commission)दखल घेतली असून त्याविरोधात सुमोटो (sumoto)दाखल केली आहे. आयोगाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येईल.

मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. अरुण मिश्रा (Arun Mishra) म्हणाले, बीरभूम जिल्हात झालेल्या हत्याकांडाविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून, या संदर्भात स्वतः सुमोटो दाखल केली आहे. तसेच NHRC chir टीम स्वतः या प्रकरणामध्ये तपास करणार आहे.

बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई (Bogatui) गावात मंगळवारी भीषण घटना घडली. तृणमूल काँग्रेसच्या (Congress) एका नेत्याची बॉम्ब (Bomb) फेकून हत्या करण्यात आली. त्यानंतर काही समाजकंटकांनी काही घरांना आगी लावल्या. व त्या आगीमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना समोर येताच बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्व स्तरातून यावर टीका होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले असून अशा प्रकारच्या राजकीय घटनांच समर्थन करणाऱ्यांना जनतेने माफ करू नये असे ते म्हणाले. यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनीदेखील पंतप्रधान यांचे जे म्हणणे आहे, तेच आपले मत आहे असे माध्यमांशी बोलताना सांगितले. या सर्व प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा