उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. फाटलेली जीन्स घालणारी महिला काय संस्कार देणार हे सगळं बरोबर आहे का? असं वक्तव्य मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर केलं आहे. ते बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजन केलेल्या कार्यशाळेत बोलत होते. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडची बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने महिलांच्या पोषाखावरून ट्विट केले होते. या सर्वावरून मुलींच्या पेहरावाबद्दल उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा कंगनाच्या सुरात सूर मिळवत असल्याचे दिसून येते.
कार्यक्रमात संस्कारांबात बोलत असताना तीरथ सिंह यांनी महिलांच्या पेहरावावर वक्तव्य केले आहे. हल्ली महिला फाटलेल्या जीन्स परिधान करतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार असे वक्तव्य तीरथ सिंह यांनी केले या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही तीरथ सिंह यांनी मोदींची तुलना प्रभू रामांशी केली होती यामुळे त्यांना टीकेची धनी व्हावं लागलं होत. यावेळी त्यांनी आई वडिलांचे मुलांवरील संस्कार आणि मुलांवरील संस्काराला आईवडिल जबाबदार असतात असे तीरथ सिंह यांनी म्हटले होते. तसेच यावेळी तीरथ सिंह रावत यांनी प्रवास करतानाचा अनुभव सांगितला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने त्या ट्विटमध्ये एशियंट भारत मधील एक फोटो शेअर केला होता. या ट्विटमध्ये एका फोटोमध्ये 3 महिला दिसत आहेत. १९८५ सालामधील डॉक्टर दाखवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा समावेश आहे. त्या या फोटोमध्ये भारतीय पेहरावामध्ये दिसतं आहेत. या पोस्टसोबतच "या इतिहासातील महत्वाच्या महिला असून यांनी फक्त स्वतःचे प्रतिनिधित्व न करता संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आज अशा महिलांचे फोटो काढले गेले तर ते जीन्स टॉपमध्ये असतील. यामधून फक्त पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले जाते." असे कॅप्शन देते कंगनाने अमेरिकन वेशभूषेवर टीका केली आहे. असे ट्विट करणारी कंगना मात्र वेस्टर्न आऊटफिटला नेहमीच पसंती देताना दिसते.