Mahayuti 
Vidhansabha Election

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपला 130 हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती पडणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुती सरकार स्थापन करणार आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र, महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे.

थोडक्यात

  • महायुतीत भाजपच मोठा भाऊ

  • भाजपचा 130 हून अधिक जागांवर विजय

  • राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

  • सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपला 130हुन अधिक जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती पडणार असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच वर्षा बंगल्यावर शिंदे फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली आहे. त्यामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेला वेग आल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, अद्याप महायुतीकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचे चेहरे कोण हे जाहीर करण्यात आलेलं नाही.

महायुतीने तब्बल २३५ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार २८८ पैकी २३६ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३७, शिवसेनेला (शिंदे) ५८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १४ जागा जिंकल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. महायुतीचा सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला असून वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा