Mumbai

वरळीत आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्या शायना एन.सी यांचं आव्हान?

विधासभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधासभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यातच आता वरळीत आदित्य ठाकरेंना शायना एनसींचं आव्हान असल्याचे बोललं जात आहे.

आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपने मोठी रणनिती आखली असल्याची माहिती मिळत आहे. वरळी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

यातच मनसेकडून आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे मैदानात उतरणार तर शिवसेनेकडून सुशीबेन शाह सुद्धा इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा