Gujrat Titans Vs. Lucknow SuperGiants 
IPL T20 2021

IPL2022: दोन्ही नवे संघ आज एकमेकांना भिडणार

Published by : Vikrant Shinde

IPL च्या 15व्या (IPL 2022) हंगामाला आता सुरूवात झाली असून सामन्यांची रंगत आता चांगलीच वाढू लागली आहे. यंदाच्या हंगामातील 3 सामने पार पडले आहेत आजची (28-03-2022) लढत मात्र काहीशी खास असणार आहे. ही लढत खास असण्याचं कारण म्हणजे, आजचा सामना हा लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) असा असणार आहे. दरम्यान, हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात IPL मध्ये नव्याने सामील झालेले संघ आहेत.

गुजरातची धुरा हार्दिक पंड्याच्या हाती:
यंदाच्या हंगामात नव्यानेच समाविष्ट झालेल्या गुजरात टायटन्स ह्या संघाची धुरा मागच्या हंगामापर्यंत मुंबईच्या (Mumbai Indians) गोठात असलेला हार्दिक पंड्या (hardik Pandya) सांभाळणार आहे. विस्फोटक फलंदाज व आक्रमक गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला हार्दिक IPL मध्ये पहिल्यांदाच कर्णधारपदाची (Gujrat Captain) जबाबदारी सांभाळताना पाहायला मिळणार आहे.

लखनौचं नेतृत्त्व के एल राहूल करणार:
मागील हंगामापर्यंत पंजाबच्या संघाचं नेतृत्त्व करणारा के एल राहूल (K L Rahul) यंदाच्या हंगामात मात्र लखनौच्या (Lucknow Super Giants) संघाचं नेतृत्त्व करतााना दिसणार आहे. सलामीचा फलंदाज व उत्तम विकेटकीपर म्हणून ओळखला जाणारा राहूल यंदा लखनौचं नेतृत्त्व (Lucknow Captain) करताना काय कमाल करतो याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख