International

BTS मेंबर जोंगकुक कोरोना पॉझिटीव्ह; ग्रॅमी स्पर्धेत भाग घेण्यावर प्रश्नचिन्ह

Published by : left

BTS ग्रुपचे मेंबर जोंगकुक (Jungkook) याला कोरोनाची (Covid-19) लागण झाली आहे. जोंगकुक (Jungkook) सध्या सेल्फ क्वारंटाईन झाला असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत. BTS ने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जोंगकुक (Jungkook) ग्रॅमी 2022 पुरस्कार (Grammy 2022) सोहळ्यात परफॉर्म करणार की नाही यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

BTS ने एक परिपत्रक काढत माहिती दिली की, BTS मेंबर जोंगकुक (Jungkook) कोरोना पॉझिटीव्ह (Covid-19) आढळला आहे. जोंगकुकची (Jungkook) आरटीपीसीआऱ टेस्ट (RTPCR -test) निगेटीव्ह आली होती. रविवारी 27 मार्चला ग्रॅमी 2022 पुरस्कार सोहळ्यात (Grammy 2022) परफॉर्म करण्यासाठी त्याने कोरीयातून युनायटेड स्टेटसाठी उड्डाण केले होते. या उड्डाणापुर्वी केलेल्या चाचणीत टेस्ट निगेटीव्ह आली होती. दरम्यान लास वेगासमध्ये आल्यानंतर जोंगकुकला प्रकृती अस्वस्थ वाटत होती. तसेच त्याच्या घशाला खवखव होत होती. त्यामुळे त्याने रॅपिड पीसीआर टेस्ट आणि स्टॅंन्ड़र्ड पीसीआर टेस्ट केली. सोमवारी 28 मार्चला आलेल्या दोन्ही चाचण्या पॉझिटीव्ह आल्या.

दरम्यान जोंगकुक आता सेल्फ क्वारंटाईन असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत.तसेच अमेरीकेने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे तो पालन करत आहे. जोंगकुक याला कोरोनाची लागण झाल्याने तो ग्रॅमी 2022 पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करणार की नाही असा मोठा प्रश्न आहे.मात्र BTS ऑर्गनायझऱशी बोलत आहेत.

"युनायटेड स्टेट्समधील नंतरच्या वेळापत्रकात जंग कूकचा सहभाग कोविड-19 वरील स्थानिक नियमांद्वारे निर्धारित केला जाईल, आम्ही पुरस्कार आयोजकांशी सक्रियपणे चर्चेत आहोत. तुमची चिंता वाढवल्याबद्दल आम्ही आमच्या चाहत्यांची मनापासून माफी मागू इच्छितो. युनायटेड स्टेट्समधील वेळापत्रकाच्या आधी आणि संपूर्ण कालावधीत आमच्या कलाकारांच्या आरोग्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न असूनही. आम्ही आमच्या सर्व चाहत्यांकडून तुमची उदार समज आणि पाठिंबा मागतो," असे निवेदनात म्हटले आहे.

BTS लास वेगासमधील एलिजियंट स्टेडियममध्ये स्टेजवर नृत्य करण्यास परवानगी देण्यासह चार मैफिलींमध्ये सादरीकरण करणार आहे. ते 8 एप्रिल, 9 एप्रिल, 15 एप्रिल आणि 16 एप्रिल रोजी थेट कार्यक्रम आयोजित करतील. आता यामध्ये जोंगकुक (Jungkook) सहभाग असेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा