Budget 2022

Budget 2022 : तणाव आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी ‘National Mental Health Program’

Published by : Lokshahi News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प असून गेल्यावर्षीसारखे यावर्षी देखिल निर्मला सीतारामन या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला.
या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थमंत्र्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करून 'नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम'साठी (Digital health ecosystem) खुले व्यासपीठ सुरू करण्याची माहिती दिली. सरकार हेल्थ इकोसिस्टम डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. यात आरोग्याशी संबंधित अनेक माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

23 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र उभारण्यात


जगात सुरु असलेल्या कोरोना महामारीने लोकांचे मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने मानसिक आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्यावर होत असलेला परिणाम पाहता केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी देशात 23 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या पाहा

  • नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टममध्ये प्रत्येक नागरिकाला एक वेगळी 'युनिक हेल्थ आयडेंटिटी' दिली जाणार असून यात तुमच्या आरोग्याचा तपशील घेतला जाणार
  • कोरोनामुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 23 संस्थांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.
  • लोक तणाव (Stress), नैराश्य (Depression) आणि अस्वस्थता यांसारख्या विषयांवर बोलू शकतात आणि त्यांना अशा मानसिक विकारांवर उपचार मिळावेत, यासाठी तज्ज्ञांशी फोनवर बोलता येणार आहे.
  • नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामद्वारे (National Tele Mental Health Program), लोक थेट तज्ज्ञांशी बोलतील आणि त्यांच्या समस्यांवर उपाय त्यांना मिळतील
  • नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम लाँच केले जाईल. याद्वारे तुम्हाला अनेक प्रकारची माहिती मिळेल.
  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), बहुतेक महिला नैराश्याने ग्रस्त आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल टेली-मेंटल हेल्थच्या मदतीने लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा