केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प असून गेल्यावर्षीसारखे यावर्षी देखिल निर्मला सीतारामन या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं एअर इंडियासाठी देखिल बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. इंडिया मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर २७ जानेवारी रोजी पूर्ण झाली. टाटा समूहाकडे ही मालकी ६७ वर्षांनंतर गेली.
हा सर्व एअर इंडियाचा सौदा १८ हजार कोटींना झाला मात्र त्याच्या थकित कर्जाती तब्बल ५२ हजार कोटींची रक्कम अद्याप रखडली होती. अखेर ही रक्कम फेडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अंदाजित भांडवली खर्चाच्या सुधारित अंदाजामध्ये हा खर्च समाविष्ट करण्यात आला होता. त्यासाठी या अर्थसंकल्पात आता तरतूद करण्यात आली आहे.