WHAT GETS CHEAPER AND WHAT BECOMES COSTLIER FOR COMMON CITIZENS 
Budget

Budget 2026: सर्वसामान्यांना दिलासा की खिशावर ताण? काय स्वस्त, काय महाग; जाणून घ्या सविस्तर

Common Man Budget: Budget 2026 मध्ये सर्वसामान्यांसाठी काही दिलासादायक तर काही खर्च वाढवणारे निर्णय घेण्यात आले आहेत. औषधे, EV बॅटरी, मोबाईल व घरगुती वस्तू स्वस्त होणार असून दारू, स्क्रॅप आणि ट्रेडिंग महाग होणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत Budget 2026 सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. विशेषतः महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हे बजेट दिलासादायक ठरणार की आणखी आर्थिक ओझं वाढवणार, याची उत्सुकता होती. बजेट भाषणात अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, काही वस्तू स्वस्त तर काही वस्तू महाग होणार आहेत.

कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त?

अर्थमंत्र्यांच्या घोषणांनंतर अनेक दैनंदिन आणि गरजेच्या वस्तूंवर करसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावरील ताण काही अंशी कमी होणार आहे.

खेळासंबंधित साहित्य स्वस्त

क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी खेळासंबंधित साहित्यावरील कर कमी करण्यात आला आहे. यामुळे क्रीडा साहित्य स्वस्त होणार असून, तरुणांना आणि खेळाडूंना याचा थेट फायदा होणार आहे.

मधुमेह आणि कॅन्सरची औषधे स्वस्त

आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेत मधुमेह (शुगर) आणि कॅन्सरवरील औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. कॅन्सरवरील 17 औषधे आणि 7 गंभीर आजारांवरील औषधे स्वस्त होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बीडी स्वस्त, सिगारेट मात्र महागच

बजेटनंतर बीडीच्या किमती कमी होतील, मात्र सिगारेट पिणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.

लेदर उत्पादने स्वस्त

चामड्याचे बूट, पिशव्या आणि इतर लेदर उत्पादने स्वस्त होणार असल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे.

मोबाइल फोन आणि EV बॅटरी स्वस्त

मोबाइल फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटऱ्यांच्या किमती कमी होतील. यामुळे तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

घरगुती आणि ऊर्जा क्षेत्रात दिलासा

मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे, सोलर साहित्य, कपडे तसेच बायोगॅस मिश्रित CNG स्वस्त होणार आहे. याचा थेट फायदा मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल.

बजेटनंतर काय महाग झालं?

जिथे काही गोष्टी स्वस्त झाल्या, तिथे काही बाबतीत नागरिकांना अधिक खर्च करावा लागणार आहे.

दारू महाग

उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे मद्य (दारू) महाग होणार आहे. यामुळे तळीरामांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

स्क्रॅप आणि खनिजे महाग

स्क्रॅप आणि काही खनिजांवरील शुल्क वाढल्याने बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो.

फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग महाग

शेअर बाजारातील फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगवर अधिक खर्च करावा लागणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचे गणित बदलू शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा