CIGARETTE PRICE HIKE AFTER NEW TAX RULES | CHECK LATEST RATES 
Budget

Budget 2026 : सिगारेट महागली! नव्या करानंतर 10 रुपयांची सिगारेट आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Cigarette Price Hike: अर्थसंकल्प 2026 मध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर नवे कर लागू करण्यात आले आहेत.

Published by : Dhanshree Shintre

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटवर नवीन कर लागू करण्याची घोषणा केली असून, हा कर 1 फेब्रुवारीपासून प्रभावी होईल.

सिगारेटच्या भाववाढीबाबत नागरिक उत्सुक आहेत. आधी सिगारेटवर २८% GST आणि २०१७ पासून लागू असलेला कंपन्सेशन सेस आकारला जात होता. नवीन करामुळे आता सिगारेटच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

जुनी करप्रणाली बंद करून नवीन योजनेअंतर्गत सिगारेटवर ४०% GST, एक्साईज ड्युटी आणि हेल्थ व नॅशनल सिक्योरिटी सेस आकारला जाणार आहे. परिणामी, प्रत्येक सिगारेटच्या किमतीत लक्षणीय वाढ होईल.

दहा रुपयांच्या सिगारेटवर आता २ ते ३ रुपयांची एक्साईज ड्युटी लागू होणार आहे. परिणामी, या सिगारेटच्या किमती आता १२ ते १३ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

CIGARETTE PRICE HIKE AFTER NEW TAX RULES | CHECK LATEST RATES

पूर्वी १० सिगारेटच्या पॅकेटची किंमत १०० रुपये होती, आता ती १३० ते १४० रुपयांपर्यंत वाढणार आहे. प्रिमियम सिगारेटही महागणार असून, एका सिगारेटच्या किमतीत ३.६ ते ४ रुपये वाढ होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा