AIRTEL PREPAID RECHARGE PLAN: UNLIMITED 4G AND 5G DATA WITH OTT AND CLOUD BENEFITS 
Auto Tech

Airtel Recharge Plan: 5G सोबत मिळणार आता 4G Unlimited डेटा देखील! नवीन प्लॅनचे फायदे वाचून व्हाल चकित

Airtel Recharge: एअरटेलने प्रीपेड युजर्ससाठी 399 व 449 रुपयांच्या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा सुरु केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

भारती एअरटेलने प्रीपेड यूजर्ससाठी आणखी एक खास सरप्राईज आणले आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने त्यांच्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 4G डेटाची सुविधा सुरू केली आहे. यापूर्वी कंपन्या अनलिमिटेड 5G डेटा देत असत, पण आता एअरटेल यूजर्सना अनलिमिटेड 4G आणि 5G दोन्ही डेटा एकत्र ऑफर करत आहे.

ही सुविधा कंपनीने नवीन प्लॅन्स लाँच न करता, जुन्या 399 रुपये आणि 449 रुपयांच्या प्लॅन्समध्ये जोडली आहे. 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये आता अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड 4G व 5G डेटा मिळणार आहे. याचा अर्थ प्रत्येक 30 दिवसांसाठी 300 जीबीची कमर्शियल लिमिट आहे, तर प्लॅनची वैलिडिटी 28 दिवसांची आहे.

हा प्लॅन कमी कालावधीसाठी जास्त डेटा हव्या असणाऱ्या यूजर्ससाठी उत्तम आहे. याशिवाय, एका वर्षासाठी अ‍ॅडोब एक्सप्रेस प्रीमियम, एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचा मोफत प्रवेश आणि मोफत हॅलोट्यून्ससारखे अतिरिक्त फायदेही मिळतील. दुसरीकडे, 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्येही 28 दिवसांची वैलिडिटी असून, अनलिमिटेड 4G व 5G डेटा (30 दिवसांसाठी 300 जीबी), अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतील.

यात अतिरिक्त फायदे म्हणजे गुगल वनवर 30 जीबी क्लाउड स्टोरेज, जिओ हॉटस्टार मोबाईल 28 दिवसांसाठी, सोनी लिव्ह व एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले अंतर्गत 20 ओटीटी अ‍ॅप्स, अ‍ॅपल म्युझिक सहा महिन्यांसाठी आणि मोफत हॅलोट्यून. ही दोन्ही प्लॅन्स सध्या उपलब्ध आहेत आणि यूजर्सना डेटा वापराची नवीन मजा देणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा