महिंद्रा ऑटोने आपल्या लोकप्रिय Thar Roxx लाइनअपचा विस्तार करत नवीन Star Edition लाँच केला आहे. हा स्पेशल एडिशन मेकॅनिकल बदलांपेक्षा व्हिज्युअल अपील, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि उत्कृष्ट फीचर-व्हॅल्यूवर भर देतो. सुरुवातीची इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमत १६.८५ लाख रुपये असल्याने हा Thar Roxx रेंजमधील सर्वात व्हॅल्यू-फॉर-मनी पर्याय ठरत आहे.
एक्सटीरियरमध्ये पियानो ब्लॅक ग्रिल आणि १९-इंच अलॉय व्हील्सवर पियानो ब्लॅक फिनिश देऊन या एडिशनला प्रीमियम आणि खास लूक दिला आहे, जो स्टँडर्ड व्हेरिएंट्सपेक्षा वेगळा दिसतो. इंटीरियर पूर्णपणे ऑल-ब्लॅक थीमवर आधारित असून, ऑल-ब्लॅक लेदरेट अपहोल्स्ट्रीसोबत सुेड अॅक्सेंट्स केबिनला अधिक आकर्षक आणि प्रीमियम फील देतात. रंग पर्यायांमध्ये नवीन हीरो कलर सिट्रीन येलो, टॅंगो रेड, एव्हरेस्ट व्हाइट आणि स्टेल्थ ब्लॅकचा समावेश आहे.
Star Edition ग्राहकांच्या सर्वाधिक मागणी असलेल्या फीचर्सने युक्त आहे. कम्फर्ट आणि प्रीमियम फिनिशमध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, स्लाइडिंग आर्मरेस्ट, ६०:४० स्प्लिट रियर सीट्स (मल्टी-पॉइंट रिक्लाइनसह), फुली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, इलेक्ट्रिक फोल्ड ORVM, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, टायर डायरेक्शन मॉनिटरिंग सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीत २६.०३ सेमी HD टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, HD डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Adrenox कनेक्टेड कार टेक (Alexa Built-in आणि ८३ कनेक्टेड फीचर्ससह), Android Auto व Apple CarPlay (वायर्ड व वायरलेस), ३६० डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा आणि ९-स्पीकर Harman Kardon QuantumLogic प्रीमियम ऑडिओ सिस्टम मिळतात. याशिवाय अॅप्रोच अनलॉक आणि वॉक-अवे लॉक सुविधाही आहेत.
सुरक्षिततेसाठी ५-स्टार Bharat NCAP रेटिंगसाठी इंजिनिअर्ड स्ट्रक्चर, ६ एअरबॅग्स (ड्रायव्हर, पॅसेंजर, साइड आणि कर्टेन), TPMS, फ्रंट-रियर पार्किंग सेन्सर्स, रियर पार्किंग कॅमेरा, ऑटो-डिमिंग IRVM, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक, इम्मोबिलायझर आणि E-Call व SOS फंक्शन यांसारखे मजबूत फीचर्स आहेत.
हा स्पेशल एडिशन तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे : D22 MT (RWD) - १६.८५ लाख रुपये, G20 AT (RWD) - १७.८५ लाख रुपये आणि D22 AT (RWD) - १८.३५ लाख रुपये. एक्सक्लूसिव्ह ब्लॅक्ड-आउट ओळख, टॉप-एंड फीचर्स आणि मजबूत सेफ्टी पॅकेजमुळे हा पर्याय SUV प्रेमींसाठी आकर्षक ठरेल, असे महिंद्रा कंपनीकडून सांगितले जात आहे.