Nothing CMF Launches 
ऑटो टेक

Nothing CMF: नथिंग्जच्या CMF सब-ब्रँडचा हेडफोन प्रो आता भारतात, जाणून घ्या डिव्हाइसची किंमत आणि खास वैशिष्ट्ये काय आहेत?

Nothing CMF: ANC, हायब्रिड ऑडिओ मोड्स, मॉड्यूलर डिझाइन आणि १०० तासांची बॅटरी लाइफसह हेडफोन फ्लिपकार्ट आणि निवडक स्टोअर्सवर उपलब्ध आहे. लॉन्च प्राईस ६,९९९ रुपये.

Published by : Dhanshree Shintre

नथिंगच्या सब-ब्रँड सीएमएफ बाय नथिंगने भारतात त्यांचा पहिला ओव्हर-इअर वायरलेस हेडफोन 'सीएमएफ हेडफोन प्रो' लाँच केला आहे. या हेडफोन्सची किंमत ७,९९९ रुपये ठेवण्यात आली असली तरी २० जानेवारीपासून मर्यादित काळासाठी ६,९९९ रुपयांच्या लॉन्च प्राईसवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. हे हेडफोन्स फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर मिळणार असून, गडद राखाडी, हलका हिरवा आणि हलका राखाडी असे तीन रंग पर्याय असतील.

हे हेडफोन्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सपोर्ट करतात, जे सीएमएफचे ओव्हर-इअर मॉडेल्समधील पहिले ANC-सक्षम हेडफोन आहे. यात ४० मिमी निकेल-प्लेटेड ड्रायव्हर्स आहेत, जे हायब्रिड अ‍ॅडॉप्टिव्ह ANC देऊन ४० दिसिबलपर्यंत आवाज कमी करतात. चांगल्या साउंड एक्सपीरियन्ससाठी सिनेमा आणि कॉन्सर्टसारखे स्पेशल ऑडिओ मोड्स उपलब्ध आहेत. याशिवाय LDAC आणि हाय-रेझ ऑडिओ सपोर्टमुळे स्मार्ट हेडफोन्ससारखी क्वालिटी मिळते.

हेडफोन्सचे डिझाइन पारदर्शक आणि मॉड्यूलर आहे, ज्यात टच कंट्रोल्सऐवजी फिजिकल बटणे आणि रोलर डायल्स आहेत. व्हॉल्यूम, प्लेबॅक कंट्रोलसाठी रोलर डायल, बास-ट्रेबल एडजस्टमेंटसाठी एनर्जी स्लायडर आणि कस्टम बटण यासारख्या फीचर्स आहेत. इअर कुशन सहज बदलता येतात. नथिंग एक्स अॅपद्वारे ही सर्व सेटिंग्ज आणि वैयक्तिक साउंड प्रोफाइल (ऐकण्याच्या क्षमतेनुसार ऑडिओ ट्यूनिंग) सेट करता येते.

बॅटरी लाइफ ही या हेडफोन्सची खासियत आहे. ANC बंद असताना १०० तासांपर्यंत आणि ANC चालू असताना ५० तासांपर्यंत चालतात. USB टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्ट असून, फक्त ५ मिनिटांच्या चार्जिंगने ANC शिवाय ८ तास बॅटरी मिळते. पूर्ण चार्ज होण्यास दोन तासांपेक्षा कमी वेळ लागतो. मोबाईल चार्जिंगसाठी वापरता येणाऱ्या टाइप-सी केबलनेही हे हेडफोन्स चार्ज करता येतात.

या किंमतीत ANC, दीर्घ बॅटरी आणि मॉड्यूलर डिझाइन देणाऱ्या या हेडफोन्समुळे बजेट सेगमेंटमध्ये स्पर्धा तीव्र होईल. सीएमएफ हेडफोन प्रो लवकरच बाजारात उपलब्ध होत असल्याने ऑडिओप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा