Gold and Sliver Rate 
Business News

Gold and Sliver Rate : सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घट; आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम

सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घट नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,175 रुपयांनी खाली येत प्रति तोळा 1,56,147 रुपयांवर स्थिरावला. करांसह हा दर सुमारे 1, 60,831 रुपये आहे.

Published by : Riddhi Vanne

सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घट नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,175 रुपयांनी खाली येत प्रति तोळा 1,56,147 रुपयांवर स्थिरावला. करांसह हा दर सुमारे 1, 60,831 रुपये आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याने 1,76,121 रुपयांचा उच्चांक गाठला होता; त्या तुलनेत सध्या किंमत जवळपास 20 हजारांनी कमी आहे. 22 कॅरेट सोनं 1,43,031 रुपये तोळा, तर 18 कॅरेट 1,17,110 रुपये तोळा दराने विकले जात आहे. इतर कॅरेटमध्येही घसरण दिसून आली आहे.

चांदीच्याही दरात मोठी पडझड झाली. किलोमागे 5,835 रुपयांची घट होऊन भाव 2,60,614 रुपयांवर आला आहे. जीएसटी धरून किंमत सुमारे 2,68,432 रुपये होते. जानेवारी अखेरीस चांदीने 3,85,933 रुपयांचा उच्चांक गाठला होता; त्यानंतर भाव लक्षणीयरीत्या खाली आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा यावर परिणाम झाला आहे. अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे डॉलर बळकट झाला आणि व्याजदर कपातीबाबतची शक्यता कमी झाली. त्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढला.

मात्र, गेल्या वर्षभरात सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला फायदा झाला होता. जागतिक तणाव कमी होताच गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळताना दिसत आहेत, त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या मागणीत सध्या नरमाई आहे.

थोडक्यात

  • सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घट नोंदवली गेली.

  • 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,175 रुपयांनी खाली येत प्रति तोळा 1,56,147 रुपयांवर स्थिरावला.

  • करांसह हा दर सुमारे 1, 60,831 रुपये आहे.

  • काही दिवसांपूर्वी सोन्याने 1,76,121 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा