Airtel Users 
Business News

Airtel Usersना मोठा दिलासा! कॉल चालू असताना मिळेल सतर्कतेचा अलर्ट, AI सुरक्षा कवच तुमच्या OTPला करेल सुरक्षित!

ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक वेळा लोक अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून ओटीपी सांगतात आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातील रक्कम किंवा वैयक्तिक माहिती धोक्यात येते.

Published by : Riddhi Vanne

ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक वेळा लोक अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून ओटीपी सांगतात आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातील रक्कम किंवा वैयक्तिक माहिती धोक्यात येते. कधी बँकेचा कर्मचारी, कधी कुरिअर एजंट तर कधी कस्टमर केअर म्हणून कॉल करून फसवणूक केली जाते.

यावर उपाय म्हणून एअरटेलने नवीन एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा सुविधा सुरू केली आहे. कॉलदरम्यान जर तुमच्या मोबाईलवर बँकेचा ओटीपी आला, तर ही प्रणाली लगेच सावध करते. म्हणजेच, “ओटीपी सांगू नका” असा इशारा वेळेवर मिळतो.

कंपनीच्या मते, ही यंत्रणा संशयास्पद परिस्थिती ओळखून ग्राहकांना सतर्क ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याआधीही एअरटेलने स्पॅम कॉल ओळखणे आणि धोकादायक लिंक्स रोखणे अशा सुविधा दिल्या आहेत. सध्या ही सेवा काही भागात सुरू झाली असून लवकरच देशभर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे ओटीपीसंबंधित फसवणूक टाळण्यास मोठी मदत होऊ शकते.

थोडक्यात

  1. अनोळखी लोकांकडून ओटीपी मागवून पैसे किंवा वैयक्तिक माहिती हानी पोहोचवली जाते.

  2. बँकेचा कर्मचारी, कुरिअर एजंट किंवा कस्टमर केअर असा सांगून कॉल करून फसवणूक केली जाते.

  3. कधीही ओटीपी किंवा व्यक्तिगत माहिती अनोळखी लोकांना देऊ नका.

  4. एआय तंत्रज्ञानावर आधारित सुविधा जे कॉलदरम्यान मोबाईलवर येणारा बँकेचा ओटीपी ओळखते.

  5. “ओटीपी सांगू नका” असा चेतावणी संदेश वेळेवर मिळतो, ज्यामुळे फसवणूक टाळता येते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा