Business News

Gold Rate : पाच वर्षापुर्वीच्या सोन्याला आज किती भाव? जाणून घ्या...

सध्या सोन्याचे दर रोज नवे विक्रम करत आहेत. त्यामुळे सोने घेणं सर्वसामान्यांसाठी अवघड झालं आहे. काही तज्ज्ञांच्या मते येत्या काळात सोन्याचा दर आणखी वाढू शकतो.

Published by : Riddhi Vanne

सध्या सोन्याचे दर रोज नवे विक्रम करत आहेत. त्यामुळे सोने घेणं सर्वसामान्यांसाठी अवघड झालं आहे. काही तज्ज्ञांच्या मते येत्या काळात सोन्याचा दर आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो. काही वर्षांपूर्वी घेतलेल्या सोन्याला आज किती भाव मिळेल?

भारतीय घरांमध्ये सोने ही केवळ शोभेची वस्तू नाही, तर भविष्यासाठीची सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मात्र, जुने दागिने विक्रीस काढल्यावर अपेक्षित रक्कम मिळत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. यामागचं मुख्य कारण म्हणजे दागिन्यांमध्ये मिसळलेले इतर धातू, तसेच डिझाइनसाठी आकारलेले अतिरिक्त खर्च.

साधारण पाच वर्षांपूर्वी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 50 हजारांच्या आसपास होता. आज तो दर दीड लाखांच्या पुढे गेला आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, ज्यांनी नाणं, बिस्किट किंवा साखळीऐवजी थेट शुद्ध सोने घेतलं आहे, त्यांनाच याचा जास्त फायदा झाला आहे.

दागिने घेताना आपण फॅशन, नक्षीकाम आणि घडणावळीसाठी जास्त पैसे देतो. पण विक्रीच्या वेळी या गोष्टींचा विचार केला जात नाही. दागिने वितळवून उरलेल्या शुद्ध सोन्यालाच किंमत दिली जाते. त्यामुळे जुने दागिने विकताना अपेक्षेपेक्षा कमी रक्कम हातात पडते. म्हणूनच सोने खरेदी करताना हॉलमार्क असलेले आणि विश्वासार्ह ठिकाणाहून घेतलेले सोने निवडणे अधिक फायदेशीर ठरते.

थोडक्यात

  • सध्या सोन्याचे दर रोज नवे विक्रम करत आहेत.

  • त्यामुळे सोने घेणं सर्वसामान्यांसाठी कठीण झाले आहे.

  • तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात सोन्याचा दर आणखी वाढू शकतो.

  • जुने सोनं विकल्यावर अपेक्षित रक्कम न मिळण्याचे तक्रारी वाढल्या.

  • मुख्य कारण: दागिन्यांमध्ये मिसळलेले इतर धातू आणि डिझाइनसाठी अतिरिक्त खर्च

  • भारतीय घरांमध्ये सोने फक्त शोभेची वस्तू नाही, तर सुरक्षित गुंतवणूक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा