थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
UIDAI ने आता आधार अपडेट प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. नवीन लाँच केलेल्या आधार अॅपमुळे तुम्हाला केंद्रात जाण्याची किंवा मोठ्या रांगेत उभं राहण्याची गरज उरणार नाही. या अॅपच्या मदतीने तुम्ही घरी बसून तुमचा पत्ता सहज अपडेट करू शकता. UIDAI ने X वर याबाबत माहिती देत यूजर्सना अॅपचा अनुभव feedback.app@uidai.net.in वर शेअर करण्याचे आवाहन केले आहे.
UIDAI ने नव्या आधार अॅपसाठी यूजर्सचा अभिप्राय मागवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून अॅपमध्ये येणाऱ्या अडचणी ओळखून त्यांचे त्वरित निराकरण करता येईल. मिळालेल्या अभिप्रायावर आधारित सुधारणा केल्यानंतर, नागरिकांना घरी बसून पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया अधिक सुकर होईल. UIDAI च्या मते, लवकरच हा अॅप घरबसल्या सहज पत्ता बदलण्यासाठी पूर्णतः उपलब्ध होणार आहे.
आता पत्ता अपडेट करण्याची पद्धत काय आहे?
हे फीचर उपलब्ध होण्यापूर्वी पत्ता अपडेट करण्यासाठी नागरिकांना UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला किंवा आधार केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी लागायची. प्रक्रियेदरम्यान आधार क्रमांक वापरून लॉगिन करावे लागे आणि नोंदणीकृत मोबाइलवर आलेल्या OTP द्वारेच पडताळणी पूर्ण होत असे.
आधार पत्ता अपडेट कागदपत्रे
पत्ता अपडेट करताना यूजर्सनी नवीन पत्ता टाकून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. यासाठी वीज-पाणी बिल, मालमत्ता कर पावती, पासपोर्ट, बँक पासबुक/स्टेटमेंट, रेशन कार्ड, भाडे करार, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही दस्तऐवज चालतात. विनंती सबमिट झाल्यानंतर UIDAI कागदपत्रांची तपासणी करते, ज्यास साधारण ७–१० कामकाजाचे दिवस लागतात. अर्जदारांना स्थिती पाहण्यासाठी URN मिळतो. अॅपमध्ये ही प्रक्रिया आणखी जलद होणार आहे.