अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतच एक मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, अमेरिकेत विक्रीसाठी असलेले आयफोन अमेरिकेतच तयार व्हावेत. भारत किंवा इतर कोणत्याही देशात त्यांची निर्मिती झाल्यास, त्यावर किमान 25 टक्के टॅरिफ लावले जाईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा ट्रम्प यांनी आयफोननंतर आता सॅमसंगला इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, "मी खूप पूर्वीच टीम कुक यांना माझ्या अपेक्षांबद्दल सांगितले होते. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन हे अमेरिकेतच तयार झालेले असावेत. भारत किंवा कोणत्याही इतर देशात ते तयार झालेले नसावेत. ही गोष्ट फक्त आयफोन उत्पादनापुर्ती मर्यादीत नाही तर सॅमसंग आणि इतर कंपनींसाठी देखील आहे. त्यामुळे जर भारतातून किंवा इतर देशातून तयार केले फोन अमेरिकेत विकणार असणार तर 25 टक्के टॅक्स द्यावा लागेल".
ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा आयफोनसह इतर कंपनींना देखील फटका बसला आहे. या निर्णयामुळे आयफोनचे तर 2.6 टक्के शेअर्सची घसरण झाली असून आयफोन कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा धक्का बसला आहे. चीनवर अवलंबून राहण्यापेक्षा आयफोनने भारताला प्राधान्य दिलं आहे. तसेच सॅमसंग देखील चीनवर अवलंबून नसल्यामुळे ते भारत, दक्षिण कोरिया. व्हिएतनाम आणि ब्राझीलमध्ये स्मार्टफोन तयार करत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या आग्रहामुळे कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आह.