काम धंदा

UPI Payment मध्ये मोठे बदल ; 30 जूनपासून नवीन नियम लागू

युपीआय पेमेंट्समध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी NPCI चे नवे नियम

Published by : Shamal Sawant

आजकाल 21 व्या युगात कॅशलेस इंडिया च्या माध्यमातुन वाटचाल चालु आहे. आणि त्यासाठी युपीआय हे प्रमुख साधन म्हणून वापरले जाते. कोणत्या गोष्टीसाठी पैसे द्यायचे असल्यास आता युनिफाइड इंटरफेस म्हणजेच यूपीआय वापरले जातात. हे युपीआय पेमेंट व्यवहारांचे एक मुख्य आणि विश्वसनीय साधन बनलंय. आज भारतातील जवळजवळ 60 ते 70 टक्के लोक मोठ्या प्रमाणात यूपीआयचा वापर करतात. आजकाल बहुतांश जणांच्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम सारखे अँप आहेत.

मात्र आता या युपीआय मध्ये काही महत्वाचे बदल केले गेले आहेत, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने संबंधित बदल केले असुन हे बदल आपल्याला ३० जुन पासुन आपल्या अँप हे बदल मध्ये दिसणार आहेत. NPCI ने देशातील सर्व बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांना सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 10 एपीआय नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी 31 जुलै 2025 ही तारीख ठरवण्यात आली आहे. आता UPI द्वारे पेमेंट करताना आपण ज्यांना पेमेंट करणार आहोत त्यांचे टोपणनाव किंवा फोनमध्ये सेव्ह केलेले नाव आता आपल्याला दिसणार नाही. याचा यामुळे बनावट नावे आणि QR कोडद्वारेजी फसवणुक केली जायची त्यावर आळा घातला जाणार आहे. आता फक्त बँकेत नोंदणीकृत असलेली खरी नावे आपल्याला दिसतील. यामुळे विश्वासार्हता अधिक सुरक्षित होईल. 30 जूनपासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.

तसेच नवीन नियमांनुसार 1 ऑगस्टपासून यूपीआय वापरकर्ते दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकतील. हा बदल PhonePe, Paytm, Google Pay आणि इतर UPI अँप मध्ये केला जाणार आहे. बॅलन्स वारंवार तपासल्याने सिस्टम स्लो होण्याच्या समस्या वाढतात असे एनपीसीआय चे म्हणणे आहे. UPI द्वारे ऑटोपे आदेशामध्ये ही बदल करण्यात आले असुन ते मर्यादित स्वरूपात केले आहेत.

SIP, नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन इत्यादींसाठी आता आपल्याला वाट पाहावी लागणार आहे .आता त्यांचे पेमेंट फक्त नॉन-पीक अवर्समध्येच करता येणार आहे. म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9.30 पर्यंत हे पेमेंट केले जाणार आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध बॅलन्सची माहिती पाठवतील.हे करणे बँकांना बंधनकारक राहणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. जेणेकरून यूजर्सना वारंवार बॅलन्स तपासण्याची गरज लागणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला