आजकाल महागाईच्या झळा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. या वाढत्या महागाईमध्ये खर्च सांभाळून बचत कशी करावी ? असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडत आहे. ही बचत करण्यासाठी आपण अनेक पर्याय अवलंबतो. पण हे सगळेच पर्याय योग्य असतातच असं नाही. सध्या सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल स्वरूपातून माहितीदेखील मिळते. बचतीचा एक पर्याय म्हणजे SIP. आज SIP हा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग बनला आहे परंतु SIP मध्ये चांगला परतावा मिळविण्यासाठी, काही सामान्य चुका टाळणे महत्वाचे आहे.
पहिली चूक म्हणजे बाजार पडताच SIP थांबवणे किंवा पैसे काढणे. SIPचा खरा फायदा फक्त घसरणीच्या काळात गुंतवणूक करूनच मिळतो.
दुसरी चूक म्हणजे लवकर श्रीमंत होण्यासाठी संशोधनाशिवाय टॉप फंडमध्ये गुंतवणूक करणे आणि वारंवार फंड बदलत राहणे; याचा दीर्घकालीन परताव्यावर परिणाम होतो.
तिसरी चूक म्हणजे एसआयपी सुरू केल्यानंतर ती विसरून जाणे. लोक त्यांचे उत्पन्न वाढत असताना निधीचा आढावा घेत नाहीत किंवा SIP रक्कम वाढवत नाहीत.
चौथी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे ध्येय आणि नियोजनाशिवाय गुंतवणूक करणे. SIPमध्ये स्मार्टनेस महत्त्वाचा आहे, म्हणजेच आर्थिक ध्येय निश्चित करा आणि गरजेनुसार निधी निवडा.
तसेच SIP सुरू ठेवण्यासाठी आपत्कालीन निधी तयार करायला विसरू नका. या गोष्टी लक्षात ठेवल्यासच तुम्हाला SIP मधून चांगले उत्पन्न मिळू शकते.