नुकतचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोनच्या भारतातील उत्पादनाला विरोध केला होता, तसं त्यांनी स्वतःता अॅपल कंपनीला आवाहन करत म्हटलं होत. यावर अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर देत म्हटलं होत की, तुम्ही अमेरिकेच्या उत्पादनावर भर द्या. भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या. याचपार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा विरोध असताना आता अॅपल कंपनीसाठी आयफोन बनवणारी कंपनी फॉक्सकॉन त्यांच्या भारतातील युनिटमध्ये तब्बल 1.48 अब्ज डॉलर्सची म्हणजेच जवळपास 12,,800 कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे.
फॉक्सकॉन कंपनीला चीनवर अवलंबून राहण कमी करायचं आहे. तसेच अॅपलला भारतातील आयफोनची निर्मिती वाढवायची असल्यामुळे या प्रकारची मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये याबाबत सविस्तर माहिती देत सांगितले की, फॉक्सकॉनच्या सिंगापूरच्या युनिटने तमिळनाडूमधील युजान टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या फॉक्सकॉनच्याच युनिटमध्ये ही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच टिम कूक यांनी सांगितलं की, अमेरिकन बाजारात भारतीय बनावटीच्या आयफोन्सचं सर्वाधिक प्रमाण दिसणार आहे. तसेच चीनचे उत्पादन हळूहळू कमी करून भारतात उत्पादन वाढवणे हे अॅपलचे उद्दीष्ट आहे. त्याचसोबत जूनच्या तीन महिन्यांचा कालावधीत अॅपल कंपनी भारतात तयार केलेले फोन मोठ्या प्रमाणात अमेरिकन बाजारात उपलब्ध करून देणार आहे.