काम धंदा

पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांना बँकेत नोकरीची मोठी संधी! लगेचच करा अर्ज, जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी पद्धत

बँकेत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. आयडीबीआय बँकेत मोठी मेगा भरती सुरू आहे. तब्बल 2100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

Published by : shweta walge

बँकेत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. आयडीबीआय बँकेत मोठी मेगा भरती सुरू आहे. तब्बल 2100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी अथवा डिप्लोमा केलेला असेल तरीही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहात. आयडीबीआय बँकमध्ये काम करण्याची ही मोठी संधी असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2023 आहे. यामुळे उमेदवाराने उशीर न करता थेट अर्ज करावा. idbibank.in वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करा.आयडीबीआय बँकेत ही बंपर भरती सुरू आहे.

अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. idbibank.in वर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती मिळेल. निवड झालेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा ही डिसेंबरच्या शेवटी घेतली जाईल. जर तुम्ही पदवीधर असाल तर लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी अधिकारी या पदांचा देखील समावेश असणार आहे. कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या तब्बल 800 जागा या भरल्या जाणार आहेत. कार्यकारी अधिकारी या पदाच्या तब्बल 1300 जागा भरल्या जाणार. म्हणूनच उशीर न करता लगेच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असणे आवश्यकच आहे. या भरती प्रक्रियेसाठी 1000 रूपये फिस ठेवण्यात आलीये. राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 200 रूपये फिस असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2023 आहे.

ही भरती प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झालीये. यामुळे आता अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. साधारण डिसेंबरमध्ये याची परीक्षा होईल. खरोखरच ही मोठी संधी बँकेत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. आपण लवकरात लवकर अर्ज करावा. ही मोठी बंपर भरतीचे बँकेमध्ये निघाली आहे. पदवीधरांसाठी ही मोठा संधी आहे, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट बँकेत नोकरी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?