काम धंदा

Share Market : भारतीय शेअर बाजार गडगडला ! गुंतवणूकदारांचे बुडाले तब्बल 3 लाख कोटी रुपये

इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 759 अंकांनी खाली

Published by : Shamal Sawant

इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार गदगडलेला दिसून आला . जागतिक तणावाचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 759.07 अंकांनी घसरून 81,649 वर आहे. 30 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. सेन्सेक्सच्या 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. त्याच वेळी, फक्त 5 कंपन्यांमध्ये थोडीशी तेजी दिसून आली.

निफ्टी 50 बंद झाला त्याच्या25,112.04 च्या तुलनेत 24,939.75 वर उघडला आणि जवळजवळ 1 टक्क्यांनी घसरून 24,891 च्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या 10 दिवसांपासून रशिया आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेच्या युद्धात प्रवेशामुळे तणाव आणखी वाढला, ज्यामुळे आज भारतीय बाजारावर दबाव दिसून येत आहे. BSE बाजार जवळजवळ ३ 3 लाख कोटी रुपयांनी घसरला आहे.

शुक्रवार, 20 जून रोजी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 1046 अंकांनी वाढून 82,408 वर बंद झाला आणि निफ्टी 319 अंकांनी वाढून 25,112 वर बंद झाला. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स वधारले, तर 3 घसरले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय