काम धंदा

UG आणि PG अभ्यासक्रमांसाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

मुंबई विद्यापीठाच्या UG व PG अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज करू शकतात तर अंतिम मुदत 31 जुलै 2025 पर्यंत आहे.

Published by : Prachi Nate

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र (CDOE) पूर्वीचे IDOL मार्फत शैक्षणिक वर्ष 2025–26 साठी पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रवेशासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचा बदल म्हणजे एम.ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याशिवाय सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून, पात्रताधारक विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

प्रवेशासाठी उपलब्ध अभ्यासक्रम काय-

पदवी स्तरावर — बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी), बीकॉम (कॉमर्स, अकाऊंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट), बीएस्सी (IT, संगणकशास्त्र).

पदव्युत्तर स्तरावर — एमए (भूगोल, शिक्षणशास्त्र, संज्ञापन, पत्रकारिता, समाजशास्त्र इ.), एमकॉम (अ‍ॅडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट), एमएस्सी (गणित, IT, संगणकशास्त्र), एमएमएस, एमसीए, पीजीडीएफएम (डिप्लोमा).

या अभ्यासक्रमांना UGC-DEB आणि AICTE मान्यता आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शुल्क आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अभ्यासक्रम ही या केंद्राची बलस्थाने मानली जातात.

अर्ज प्रक्रिया काय जाणून घ्या-

विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला www.old.mu.ac.in/distance-open-learning भेट द्यावी. येथे अभ्यासक्रम, पात्रता, फी संरचना व इतर सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. CDOE चे संचालक डॉ. संजीव शिवदे यांनी सांगितले की, "यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला अधिक सुलभ, डिजिटल व विद्यार्थ्याभिमुख ठेवण्यात आले आहे. अधिकाधिक विद्यार्थी या संधीचा लाभ घ्यावा."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी