काम धंदा

स्टेट बँकेत हजारो पदांची भरती; लगेचच करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI लिपिक भरती 2023 अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनिअर असोसिएट पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

SBI Clerk Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI लिपिक भरती 2023 अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनिअर असोसिएट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

अधिसूचनेनुसार, लिपिक संवर्गातील ज्युनिअर असोसिएटच्या 8283 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 17 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 7 डिसेंबर 2023 रोजी संपेल. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संकेतस्थळावर जारी केलेली अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पदासाठा 26 हजार ते 29 हजारांपर्यंत पगार देण्यात येईल.

महत्वाची तारीख

अर्ज सुरू होण्याची तारीख: नोव्हेंबर 17, 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: डिसेंबर 7, 2023

प्राथमिक परीक्षा: जानेवारी २०२४

मुख्य परीक्षा: फेब्रुवारी २०२४

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पदवी असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 31 डिसेंबर 2023 किंवा त्यापूर्वीची असल्याची खात्री करावी. भरतीसाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे दरम्यान आहे.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असते. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी असलेली ऑनलाइन प्राथमिक परीक्षा घेतली जाईल. ही चाचणी 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील - इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता असेल. प्रीलिम उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. तर मेनमध्ये यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.

अर्ज फी

सामान्य/OBC/EWS श्रेणीसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे. SC/ST/PWBD/ESM/DESM यांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?