भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही, कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्यामुळे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भारतातच पूर्ण होणार आहे. हॉटेल ताज येथे 'मुंबई रायझिंग, क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या पाच जागतिक विद्यापीठांना आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.