भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या स्थितीचा थेट परिणाम शेअर मार्केटवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. काम म्हणजेच 9 मे 2025 रोजी शेअर मार्केटच्या सुरुवातीला सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला, तर निफ्टी 145 अंकांनी खाली आल्याच पाहायला मिळाला. परिणामी परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांकडून सावध पवित्रा घेण्यात येतो आहे. तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया देखील गडगडला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली आला असून, रुपया 85.88 प्रति डॉलर झाला असल्याची माहिती समोर आली. आज भारत आणि पाकिस्तान युद्धचा दुसरा दिवस आहे. आज देखील शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दोन दिवसात गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी रुपयांची गमावले आहेत.
दरम्यान शुक्रवारी 9 मे 2025 रोजी एनएसई निफ्टी 265.80 अंकांनी तर 1.10 टक्क्यांनी खाली आला असून 24,008 वर बंद झाला. त्याचसोबत सेन्सेक्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. बेंचमार्क सेन्सेक्स 880.34 अंकांनी तर 1.10 टक्क्यांनी घसरले असून 79,454.47 वर बंद झाला.
तर गेल्या दोन व्यवहार सेशनमध्ये सेन्सेक्स 1,292.31 अंकांनी आणि 1.60 टक्क्यांनी घसरला आहे. खात्री नसलेल्या गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केल्यामुळे बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे कॅपिटल्स 7,09,783.32 कोटींनी घसरून 4,16,40,850.46 कोटी झाले. जी दोन्ही देशांमधील तणावाच्या या वातावरणात गुंतवणूकदारांच्या चिंतेचे प्रतिबिंब आहे.
सेन्सेक्सच्या घसरणीमुळे आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअर्सचे नुकसान झाले . तर टायटन कंपनी, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनींच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे.