IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग याद्वारे एखादी प्राइव्हेट कंपनी गुंतवणुकदाराला आपल्या कंपनीचे शेअर्स ऑफर करते आणि त्यानंतर पब्लिक ट्रेडेड कंपनी होते. आयपीओची प्रक्रिया खाजगी मालकीच्या कंपनीला सार्वजनिक कंपनीत रूपांतरित करते. आयपीओद्वारे कंपनीला त्याचे नाव स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जाते. ही पद्धत गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर उत्तम लाभ मिळवण्याची संधी देते
IPOमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात आधी गुंतवणुकदाराला त्याचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडायला हवे. तसेच तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्म किंवा बँक अॅपद्वारे IPOसाठी अर्ज भरा आणि शेअर्ससाठी बोली किंमत निवडा. त्याचसोबत ज्या कंपनीचे IPO ऑफर तुम्हाला स्विकारायचे असतील त्यांच्या आर्थिक स्थितीची आणि भविष्यातील संभाव्यतेची माहिती काढून घ्या.
आयपीओचे दोन प्रमुख प्रकार पडतात.
1. ज्यात एक आहे निश्चित किंमत ऑफर, यात जेव्हा आपण ठराविक किंमत असलेल्या प्राथमिक सार्वजनिक प्रस्तावात सहभागी होतो, तेव्हा त्या IPOसाठी संपूर्ण रक्कम भरावी लागते.
2. दुसरा आहे बुक बिल्डिंग ऑफर, यामध्ये स्टॉकची किंमत 20 टक्के बँडमध्ये दिली जाते आणि गुंतवणुकदार यामध्ये त्यांची इच्छुक बोली लावतात. गुंतवणूकदार शेअर्सची संख्या आणि त्यासाठी देऊ इच्छित असलेली किंमत यासाठी प्रस्ताव सादर करतात.
ज्या बॅंकद्वारे आयपीओमध्ये गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणूक बँका आयपीओची किंमत ठरवतात. तसेच कंपनी तिच्या शेअर्सपैकी किती शेअर्स लोकांना विकायचे आहेत हे ठरवते आणि प्रसिद्ध गुंतवणूक बँक व्यवसायाचे अनुमान करतात. हे अुनमान झाल्यानंतर कंपनी शेअर्सची प्रारंभिक किंमत जाहीर करते. त्यानंतर जेव्हा या सगळ्याची नोंद घेतली जाते तेव्हा कंपनी शेअर्स विकण्यास सुरुवात करते.