दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीबीएसई १२ वी च्या बोर्डाच्या परिक्षेबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सीबीएसई १२ वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले. या निर्णयामुळे १२ वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द झाली असली तर अजून महाराष्ट्र एचएससी बोर्डाचा निर्णय होणे बाकी आहे. १२ वी च्या परिक्षेबाबत एकच निर्णय जाहीर करावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'जनता संवाद' मध्ये म्हटले होते. पण आजच्या बैठकीत केवळ सीबीएसई बोर्डाबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्य सरकार एचएससी बोर्डाबाबत कोणता निर्णय घेते याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.